📍 पुणे, महाराष्ट्र  •  सभासद नोंदणीसाठी संपर्क साधा नोंदणी क्र.: पुणे/०००२३९८/२०२५
॥ सहती: कार्यसाधिका ॥

शुक्ल यजुर्वेदीय
आप्तस्वकीय ब्राह्मण संस्था पुणे • परंपरा • एकता • समाजसेवा

॥ एकमेका साह्य करू,
अवघे होऊ सुपंथ ॥

समाजातील एकोपा, संस्कार आणि परंपरा जपण्यासाठी कार्यरत असलेली नोंदणीकृत सामाजिक संस्था. कुटुंबांना एकत्र आणून सांस्कृतिक वारसा जतन करणे आणि पुढील पिढीला आपल्या मूल्यांशी जोडून ठेवणे हे आमचे ध्येय आहे.

श्री मधुकर दिगंबर कुलकर्णी
Our Story

आमच्याविषयी

शुक्ल यजुर्वेदीय आप्तस्वकीय ब्राह्मण संस्था, पुणे ही समाजातील विविध क्षेत्रातील व्यक्तींना एकत्र आणणारे व्यासपीठ आहे. अनेक वर्षांपासून ही संस्था सामाजिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक उपक्रमांद्वारे समाजात सकारात्मक कार्य करत आहे.

समाजातील परंपरा जपत आधुनिक विचारांसह प्रगतीचा मार्ग स्वीकारणे, परस्पर सहकार्य वाढवणे आणि समाजातील प्रत्येक घटकाला जोडून ठेवणे हे संस्थेचे ध्येय आहे.

पर्यावरण संतुलन, गरजू लोकांना मदत, दिव्यांगांना मदत, वृद्धाश्रम आणि अनाथाश्रमांना मदत, आरोग्य शिबिरे, तसेच गरजू व रुग्णांना सहाय्य, पर्यावरण संतुलन, वृक्षारोपण, सामाजिक वनीकरण, श्रमदान शिबिरे आणि स्वच्छता मोहीम — अशा विविध उपक्रमांद्वारे संस्था समाजसेवा करत असते.

आमचे ध्येय

  • समाजातील एकात्मता आणि बंधुभाव वाढवणे
  • संस्कृती, परंपरा आणि मूल्यांचे जतन करणे
  • युवकांना समाजकार्य व नेतृत्वासाठी प्रेरित करणे
  • सामाजिक व शैक्षणिक उपक्रमांद्वारे समाजविकास साधणे
  • कुटुंबांना परस्पर सहकार्याचे मजबूत व्यासपीठ देणे
Our Initiatives

आमची कार्ये

विविध सण-उत्सवांपासून शैक्षणिक मार्गदर्शनापर्यंत — समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही अनेक उपक्रम राबवतो.

सांस्कृतिकसांस्कृतिक कार्यक्रम

सांस्कृतिक कार्यक्रम

विविध सण, उत्सव, धार्मिक कार्यक्रम आणि सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन करून समाजातील परंपरा जिवंत ठेवणे.

मेळावेसमाज मेळावे

समाज मेळावे

स्नेहमेळावे, परिचय मेळावे आणि समाज एकत्रीकरण कार्यक्रमांद्वारे सदस्यांमध्ये आपुलकी व संपर्क वाढवणे.

शैक्षणिकशैक्षणिक उपक्रम

शैक्षणिक उपक्रम

विद्यार्थी, युवक व पालकांसाठी मार्गदर्शन, जागरूकता कार्यक्रम आणि व्यक्तिमत्त्व विकास उपक्रम.

समाजसेवासमाजसेवा

समाजसेवा

गरजू व्यक्तींना मदत, सामाजिक बांधिलकी व समाजहिताचे विविध उपक्रम; वृद्धाश्रम व अनाथाश्रमांना भेटी.

युवकयुवक सहभाग

युवक सहभाग

युवकांना समाजकार्य, संस्कृती व नेतृत्वामध्ये सक्रिय सहभागासाठी प्रोत्साहन.

महिलामहिला सहभाग

महिला सहभाग

महिलांना सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमांमध्ये सक्रिय सहभागासाठी व्यासपीठ.

पर्यावरणपर्यावरण व वृक्षारोपण

पर्यावरण व वृक्षारोपण

पर्यावरण संतुलनासाठी सामाजिक वनीकरण, वृक्षारोपण आणि निसर्ग संवर्धन उपक्रमांचे आयोजन.

स्वच्छतास्वच्छता मोहीम

स्वच्छता मोहीम

श्रमदान शिबिरे, स्वच्छता मोहीम आणि सामाजिक उन्नतीसाठी सातत्याने प्रयत्न.

सहलीसहली व प्रशिक्षण

सहली व प्रशिक्षण

शैक्षणिक व धार्मिक सहली, गडकिल्ले व दुर्ग संवर्धन उपक्रम, तसेच वृद्धाश्रमासाठी सहली व मुक्कामी कार्यक्रम.

Founding Committee

संस्थापक कार्यकारिणी

संस्थेचे कार्य समर्पित पदाधिकारी, विश्वस्त आणि कार्यकारिणी सदस्य यांच्या मार्गदर्शनाखाली चालते. समाजाच्या प्रगतीसाठी ही टीम सातत्याने कार्यरत आहे.

श्री मधुकर दिगंबर कुलकर्णी
अध्यक्ष
श्री मधुकर दिगंबर कुलकर्णी
श्री प्रकाश अनंत कुलकर्णी
उपाध्यक्ष
श्री प्रकाश अनंत कुलकर्णी
डॉ. श्री शरद ज्ञानेश्वर जोशी
सचिव
डॉ. श्री शरद ज्ञानेश्वर जोशी
श्री रमेश घनश्याम भट
खजिनदार
श्री रमेश घनश्याम भट
श्री रवींद्र देविदास पाठक
समन्वयक
श्री रवींद्र देविदास पाठक
श्री नरेंद्र प्रभाकर कुलकर्णी
सदस्य
श्री नरेंद्र प्रभाकर कुलकर्णी
श्री सुनील वासुदेव कुलकर्णी
सदस्य
श्री सुनील वासुदेव कुलकर्णी
ऍड. श्री प्रमोद भालचंद्र भट
सदस्य
ऍड. श्री प्रमोद भालचंद्र भट
श्री अरविंद प्रल्हाद कुलकर्णी
सदस्य
श्री अरविंद प्रल्हाद कुलकर्णी
श्री अंकलेश्वर देविदास भट
सदस्य
श्री जनार्दन अंकलेश्वर भट
श्री संजय लिलाधर कुलकर्णी
सदस्य
श्री संजय लिलाधर कुलकर्णी
डॉ. श्री हितेश ज्ञानदेव उपाध्ये
सदस्य
डॉ. श्री हितेश ज्ञानदेव उपाध्ये
ऍड. सौं मृणाल हितेश उपाध्ये
सदस्य
ऍड. सौ. मृणाल हितेश उपाध्ये
Our Journey

स्थापनेपासूनचे कार्य

आजपर्यंतचे केलेले कार्य

  • वृद्धाश्रम व अनाथाश्रम यांना दिवाळी फराळ, गरजूपयोगी सामान आणि इतर मदत
  • पिंपळे गुरव येथे दिव्यांगांना मदत व देणगी
  • पूरग्रस्तांना मदत व देणगी
  • मार्च २०२५ मध्ये जनरल मीटिंगपूर्वी सुंदर स्नेहमिलनाचा कार्यक्रम
  • किनारा वृद्धाश्रमास सदिच्छा भेट (दि. १८/१०/२५)
  • तारा संस्थेला (विशेष मुलांसाठीची संस्था) भेट व देणगी
तारा संस्था
तारा संस्था भेट
किनारा वृद्धाश्रम भेट
किनारा वृद्धाश्रम भेट भेट
स्नेहमिलन सोहळा
स्नेहमिलन सोहळा भेट
सामाजिक उपक्रम
सामाजिक उपक्रम भेट
Meeting Calendar

कार्यकारिणी मिटिंग व दिनांक

मिटिंग - १
१०/७/२४
मिटिंग - २
३०/७/२४
मिटिंग - ३
२०/८/२४
मिटिंग - ४
१२/१०/२४
मिटिंग - ५
९/२/२५
मिटिंग - ६
२/३/२५
✦ बालाजी लॉन्स मेळावा - ७
२३/३/२५
मिटिंग - ८
२०/७/२५
मिटिंग - ९
५/१०/२५
मिटिंग - १०
२३/११/२५
✦ वार्षिक अहवाल मिटिंग - ११
३०/११/२५
Vision 2026 – 2030

येणाऱ्या वर्षातील उद्दिष्टे

०१

शासकीय सवलतींचा फायदा समाज बांधवांना मिळवण्यासाठी प्रयत्न करणे

०२

समाजातील तसेच गरजूंना मदत करणे

०३

दिव्यांगांना आणि अनाथाश्रमांना मदत करणे

०४

सर्व संस्था-सदस्यांची मीटिंग घेणे — पुण्यातील समाज बांधव एकत्रीकरण

०५

गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करणे

Honored Patrons

सन्माननीय देणगीदार

१०,०००/- पेक्षा जास्त देणगी देणारे किंवा खर्च केलेले सन्माननीय देणगीदार

#
देणगीदार
रक्कम
1
श्री मल्लेश अंद्रपूरकर (बालाजी लॉन्स) — एकदिवस लॉन्स वापरण्यास दिले
सहयोग
2
प्रसिद्ध उद्योजक बाळासाहेब करंजुले — जेवणासाठी सर्व खर्च
सहयोग
3
वेबसाईट डेव्हलपमेंटसाठी, मृणाल हितेश उपाध्ये यांनी २०,००० रुपयांची वेबसाईट पूर्णपणे मोफत तयार करून दिली आहे
₹ 20,000
4
श्री चिंतामणी बा. कुलकर्णी
₹ 50,000/-
5
श्री सुहास कुलकर्णी
₹ 50,000/-
6
डॉ. श्री प्रमोद कुलकर्णी
₹ 21,000/-
7
समाजसेवक व उद्योजक श्री रणजीत कस्पटे, पुणे
₹ 21,000/-
8
समाजसेवक व उद्योजक श्री गणेश कलाटे, पुणे
₹ 11,000/-
9
श्री ज्ञानदेव पुरुषोत्तम उपाध्ये
₹ 11,111/-
10
ऍडव्होकेट श्री प्रमोद भट
₹ 11,111/-
11
प्रमिलाताई कमलाकर पाठक (श्री अमित पाठक यांच्या मातोश्री)
₹ 11,111/-
12
राहुल कन्स्ट्रक्शन
₹ 11,111/-
13
श्री शिरीष मधुकर कुलकर्णी — स्नेहमेळाव्याचे फोटो व विडिओ-शूटिंग स्वखर्चाने
सेवा
A Sacred Prayer

पसायदान

संत ज्ञानेश्वर
॥ संत ज्ञानेश्वर ॥
आता विश्वात्मके देवे । येणे वाग्यज्ञे तोषावे । तोषोनि मज द्यावे । पसायदान हे ॥ जे खळांची व्यंकटी सांडो । तया सत्कर्मी रती वाढो । भूतां परस्परें पडो । मैत्र जीवांचे ॥ दुरितांचे तिमिर जावो । विश्व स्वधर्म सूर्ये पाहो । जो जे वांच्छील तो तें लाहो । प्राणिजात ॥ वर्षत सकळ मंगळी । ईश्वरनिष्ठांची मांदियाळी । अनवरत भूमंडळी । भेटतु भूतां ॥ चला कल्पतरूंचे आरव । चेतनाचिंतामणींचे गाव । बोलते जे अर्णव । पीयूषाचे ॥ चन्द्रमे जे अलांछन । मार्तंड जे तापहीन । ते सर्वांही सदा सज्जन । सोयरे होतु ॥ किंबहुना सर्व सुखी । पूर्ण होऊनि तिन्ही लोकी । भजिजो आदिपुरुषी । अखंडित ॥ येथ म्हणे श्री विश्वेशरावो । हा होईल दानपसावो । येणें वरें ज्ञानदेवो । सुखिया झाला ॥
Membership 2025 – 26

सभासद नोंदणी शुल्क

सन २०२५-२६ या वर्षासाठी सभासद नोंदणी व वार्षिक वर्गणी खालीलप्रमाणे आहे.

नवीन सभासद

प्रथमच नोंदणी

₹1,100/- एकदाच

प्रथमच सभासद होणाऱ्यांसाठी नोंदणी शुल्क. यात सन २०२५-२६ चे सभासदत्व समाविष्ट आहे.

नूतनीकरण

आधीच सभासद असल्यास

₹500/- दरवर्षी

जुन्या सभासदांनी त्यांचा सभासद क्रमांक (Member ID) व मागील वर्ष नमूद केल्यास, फक्त वार्षिक वर्गणी भरून सभासदत्व सुरू ठेवता येईल.

सर्वोत्तम पर्याय

आजीवन सभासदत्व

₹4,000/- एकदाच

एकदाच शुल्क भरून कायमस्वरूपी सभासदत्व — दरवर्षी वर्गणी भरण्याची गरज नाही.

सदर शुल्क रचना सन २०२५-२६ या कालावधीसाठी लागू आहे. पुढील वर्षाचे शुल्क कार्यकारिणीच्या निर्णयानुसार जाहीर केले जाईल.

नोंदणी कशी करावी?

  1. आपल्या प्रवर्गानुसार (नवीन / नूतनीकरण / आजीवन) योग्य रक्कम खालील UPI क्रमांकावर पाठवा — 9850810118@sbi किंवा फूटरमधील QR कोड स्कॅन करा.
  2. पेमेंट यशस्वी झाल्यावर मिळालेला UPI Transaction ID किंवा पेमेंटचा स्क्रीनशॉट जपून ठेवा.
  3. खालील "सभासद नोंदणी फॉर्म" उघडून आपली संपूर्ण माहिती भरा — नाव, पत्ता, संपर्क क्रमांक, नोंदणी प्रकार, आणि नूतनीकरण असल्यास जुना सभासद क्रमांक.
  4. फॉर्ममध्ये पेमेंट संदर्भ क्रमांक (Transaction ID) व स्क्रीनशॉट अपलोड करा.
  5. कार्यकारिणी पेमेंटची पडताळणी केल्यानंतर आपले सभासदत्व निश्चित केले जाईल व सभासद यादीत नाव समाविष्ट होईल.
Be A Part Of Us

आमच्यात सहभागी का व्हावे?

संस्कारप्रधान आणि प्रतिष्ठित समाजाचा भाग बना

नवीन नाती आणि सामाजिक संपर्क वाढवा

सांस्कृतिक व सामाजिक कार्यक्रमांत सहभागी व्हा

समाजहितासाठी योगदान द्या

पुढील पिढीला आपल्या परंपरांशी जोडून ठेवा

सभासद नोंदणी करा  →